वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
राळेगांव : तालुक्यात एकाच रेती घाटाचा लीलाव झाला असला तरी . मारेगांव तालुक्यातील कोसारा व आपटी रेतीघाट जरी राळेगाव तालुक्याच्या शेवटी असले तरी उपसा झालेली रेती पूर्णता वडकी राळेगांव शहरातून यवतमाळ व इतर शहरात जाते . जिल्हाधीकारी अमोल येडगे यांनी काही दिवसा आधी कळंब ला येवून विना रॉयल्टी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकावर कारवाई करुन जप्ती केली. परंतु काही दिवस लोटले आणी शनिवार रविवार आला कि रेतीचा उपसा वाढतो व एकाच दिवसात कितीतरी ट्रक जात असलेले दिसते. सर्व नियम धांब्यावर बसवून रेती उपसा व वाहतूक होत आहे . आज दि. १३ मार्च रोजी अशीच विना रॉयल्टी वाहतूक करणारा टिप्पर क्र MH 3 4 Ab 0083 सकाळी राळेगांव वर्धा बायपासवर तहसीलदार रविन्द्रकुमार कानडजे यांनी पकडला व तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला . त्यावर कुठली कारवाई केली हे अद्याप समजू शकले नाही . तसेच रामतीर्थ रेती घाटात अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे परीसरातील दहाते पंधरा ट्रॅक्टर दि १३ च्या रात्री रेती चोरून नेत असल्याची बातमी निवासी नायब तहसीलदार दिलीप बदकी यांना समजली ते तात्काळ घाटाकडे निघाले पंरतु हि माहिती चोरटयांना समजली ते पळाले नायब तहसिलदारबदकी खाली हात परतले रेती तस्करांची चेन मोठी आहे तशीच त्यांना माहीती देणारे खबरे शहरात व रस्त्याने फिरत असतात या मुळे माहीती मिळायला कठीण होत नाही .