विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : तालुक्यातील कानशिवणी सर्कल मध्ये येत असलेल्या देवडी या गावातील कर्तव्यदक्ष सरपंच सौ वैशाली विकास सदांशिव ह्या आदर्श स्त्री कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित झालेल्या. याआधीही त्या आधीही पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. आताही त्यांना छत्रपती संभाजी महाराज विचार मंच, मलकापूर, अकोला. (महाराष्ट्र) व्दारा आयोजित महिला दिनाच्या अनुषंगाने सौ. वैशाली विकास सदांशिव यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श स्त्री कार्यगौरव पुरस्कार २०२२ देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ सौ. डॉ. रेखाताई अभय पाटील ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून दामीनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक सौ. उज्वलाताई देवकर तसेच सौ. जयाताई भारती, सौ. सुरेखाताई काळे, सौ. दिपाली सोसे आदी मान्यवर महिला लाभल्या होत्या. सदर पुरस्कार सोहळा दि १४/०३/२०२२ रोजी सायंकाळी ७:०० वाजता स्थानिक छत्रपती संभाजी महाराज नगर, डॉक्टर कॉलनी, अंधविद्यालयाच्या मागे, मलकापूर, अकोला येथे प्रचंड महिलांच्या उपस्थितीत पार पडला.