सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : महीला सशक्तीकरण व सबलीकरण या उपक्रमांतर्गत 8 मार्च रोजी अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून बेबी मडावी महिला मेळावा आयोजीत करण्यात आले. पुरुषप्रधान व्यवस्थेत जेथे महीलांना वर्ण,मालमत्ता व शैक्षणिक पार्श्वभूमीवर पुरुषापेक्षा कमी लेखले जाते तेथे महीलांना सामाजिक,आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य मिळवुन देणा-या व स्वताच्या हक्कांसाठी लढणाऱ्या स्त्रीयांच्या सन्मानार्थ तसेच समाजातील कर्तुत्ववान,असामान्य कामगीरी करणा-या महीलांचा गौरव करण्याकरिता 8 मार्च हा जागतिक महिला दिन संपुर्ण जगभरात साजरा करण्यात येतो.दि.28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयार्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आले.महीला दिनाचे औचित्य म्हणून पेरमिली उप पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी धवल देशमुख यांनी महीला पोलीस हवालदार प्रणाली उंदीरवाडे यांना एक दिवसीय प्रभारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपविला तसेच पोस्टाच्या सर्व महीला अंमलदार यांनी पोलीस स्टेशन चे कामकाज आपल्या हाती घेतले सदर मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणुन वैद्यकीय अधिकारी ईशान तुरकर,प्रणाली जाधव,ऋतुजा खोब्रागडे,बँक मॅनेजर अंकुल वारके महाराष्ट्र बँक,प्रदीप शील मंडळ अधिकारी पेरमिली,किरण नैताम सरपंच पेरमिली,इष्टाम शिक्षिका शासकीय आश्रम शाळा, वैशाली जीवने समनव्यक उन्नती महिला प्रभाग संघ,तलाठी पेंदाम, ग्रामसेवक निमजे,नीलिमा बंडमवार हे होते.तसेच पेरमिली हद्दीतील आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,शालेय विद्यार्थिनी,दिव्यांग व वयस्क महिला,प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली चे आरोग्य पथक,महाराष्ट्र बँक पेरमिली चे पथक,विविध गावातील महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून सदर मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.सदर मेळाव्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.ईशान तुरकर, प्रा. आरोग्य केंद्र पेरमिली, यांनी महीला आजार व त्यावरील उपचार,तसेच गरोदर माता,स्तनदा माता याबाबतीत मार्गदर्शन केले.पेरमिली बॅक ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजर अंकुल वारके यांनी उपस्थितांना विविध शासकीय योजनांची,रोजगार व प्रशिक्षण बाबतची महिती दिली.तसेच एक दिवसीय प्रभारी अधिकारी मापोहेकॉ प्रणाली उंदीरवाडे यांनी पोलीस विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण व रोजगाराच्या संधि बाबत मार्गदर्शन केले.तसेच विविध विभागातील मान्यवरांनी उपस्थित महिलांना विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.सदर मेळाव्यात विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या किरण नैताम सरपंच पेरमिली ग्रामपंचायत,डॉ. प्रणाली जाधव वैद्यकीय अधिकारी, पेरमिली,वैशाली जीवने,प्रभाग समन्वयक,वंदना दहागावकर,उमेद संस्था मॅनेजर,अल्का तलांडी मैत्री संस्था,रजीता मुडावार,संगीता चांदेकर आशा वर्कर, पेरमिली,नंदा मडावी आशा वर्कर अालदंडी,हसिना शेख सरदार,सुषमा खुशाल दुर्गे,उन्नती प्रभाग गट अशा 10 कर्तबगार महीलांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शासकिय आश्रम शाळा पेरमिली येथील वर्ग 11 वी व 12 वी मधील गुणवत्तापूर्ण उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सीमा रामा तलांडी,रुती आत्राम,सोनाली रामदास आत्राम यांना आदर्श विद्यार्थीनी हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.तसेच मेळाव्या दरम्यान संगीत खुर्ची,रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन करुन प्रथम,द्वितीय,त्तृतिय क्रमांक पटकवणि-या स्पर्धकांना योग्य ते बक्षीस देण्यात आले.सदर मेळाव्याचे यशस्वीरित्या एक दिवसीय प्रभारी महीला पोलीस हवालदार प्रणाली उंदीरवाडे, अधिकारी धवल देशमुख,पोलीस उपनिरीक्षक गंगाधर जाधव, पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड,कामतकर,अर्चना बडा,मपोशि ज्योती निमगडे,दीप्ती कुमरे,बहिणाबाई सडमेक,वैशाली गावडे,ममता बट्टावार,लता बोगामी, सुलोचना पायम,इंदिरा मिसाळ,प्रीती नैताम तसेच जिल्हा पोलीस व एसआरपीएफ चे अधिकारी अंमलदार यांनी मोलाचे सहकार्य केले.