सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आवलमरी जवळील मौजा लंकाचेन येथील आदिवासी शेतकरी शिवराम पापया सड़मेक रा.लंकाचेन यांच्या राहत्या घराला शार्ट शर्किट मुळे अचानक आग लागली होती.त्या आगीत सम्पूर्ण घर जळून खाक झाले होते.त्यांचे पुर्ण कुटुंब रस्त्यावर आले होते.सदर बाब गडचिरोली जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच त्यानी त्वरित जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम यांना सदर ठिकाणी पाठवुन सड़मेक कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,वट्राचे सरपंच रविंद्र आत्राम,आवलमरीचे उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार,माजी सरपंच मारोती मडावी,ग्राम पंचायत सदस्य वासुदेव सिडाम,आविस कार्यकर्ते व्येँकना कोडापे,प्रकाश दुर्गे,किष्टाया आत्राम,दिपक दुर्गे,शामराव कूळमेथ,तिरुपती सड़मेक,चंद्रु कूळमेथ,शंकर कुमरे,आदि उपस्थित होते.











