सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : आलापल्ली -सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव येथे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर खड्यांचे मोठे साम्राज्य असून या मार्गावर खड्यामुळे अनेक अपघात झाले आहे.या अपघातात सुनील गंगा सोयाम वय 32 रा.निमलगुडम हा व्यक्ती जागीच ठार झाला.तर गंभीर जखमी मध्ये कमलेश हणमंतु सडमेक वय 35 रा. झिमेला व शिक्षक रमेश केसा सोयाम वय 46 रा.राजाराम यांचा समावेश आहे.अपघातात गंभीर झालेले व्यक्ती जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत होते.दि.14 मार्च रोजी संध्याकाळी रायगट्टा येथून शाळा आटोपून आलापल्ली कडे परत जात होते.सुनील गंगा सोयाम आणि कमलेश हणमंतू सडमेक हे दोघे भामरागड तालुक्यातील मनेराजाराम येथून नवस कार्यक्रमात जाऊन परत निमलगुडम आपल्या स्वगावी येत असताना नंदीगाव जवळ खड्डा चुकवण्याचा नादात दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.या अपघातात सुनिल गंगा सोयाम रा.निमलगुडा हा जागीच ठार झाला असुन गंभीर जखमीना त्वरित उप जिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलवण्यात आले आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)