सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा-मोहटोला परिसरात कारली पीक मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.त्याच अनुसंगाने कारली पीक पाहणी कार्यक्रम शेतकऱ्याच्या शेतावर नुकताच पार पडला.शेतकरी आता धानाच्या शेतीकडून कारली,मका, मिरची,भुईमूग आणि भाजीपाला शेतीकडे वळला आहे.धानाची शेती फार तोट्याची झाली आहे.उत्पादन खर्चही निघण्याची शाश्वती राहत नाही.त्यातून स्वतःला बाहेर काढून आर्थिकदृष्टीने सक्षम होण्यासाठी अधिक उत्पादन देणाऱ्या पिकाकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. किन्हाळा-मोहटोला परिसरातील शेतकरी त्यामध्ये अग्रेसर असून कारली पिकाच्या लागवडीस प्राधान्य देत आहे.शेतकरी कारली लागवडीत अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीच्या वाणाची लागवड करतात.किन्हाळा येथील प्रगतीशील शेतकरी पुरुषोत्तम ठाकरे यांच्या शेतावर कारली पीक पाहणी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शेतकऱ्यांना कारली शेतीचे मार्गदर्शन करण्यात आले.शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आले.संकरित वाण कारले पिक पाहणी कार्यक्रमाला उपस्थित राहुन देशमुख कृषी पर्यवेक्षक वडसा तसेच कोडापे कृषी सहायक वडसा, नरेंद्र तभाने,महेश भरणे,सचिन गहलोद यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात परिश्रम घेतले.कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी उपस्थित होते.











