पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड: तालुक्यात कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाचा; विशेषतः दुसरा डोसचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने प्रशासन सरसावले आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, तालुका आरोग्य अधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ. बाळ कृष्ण लांजेवार यांनी बुधवारी चिंचोली लिं. करंजखेड आदी गावांत बैठका घेतल्या; तर गुरुवारी देवगाव रंगारी, हतनूर, चापानेर आदी गावांत जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.या संवादामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करत पहिला व दुसरा डोस घेण्याचे आवाहन केले; ज्या नागरिकांनी पहिला व दुसरा डोस घेतला नसेल तर शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागेल, असे हतनूर येथे झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.हतनूर ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, नोडल अधिकारी बाळकृष्ण लांजेवार, डॉ. हेमंत गावंडे, कैलासराव अकोलकर उपस्थित होते.या बैठकीसाठी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत गावंडे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण नलावडे, मंडळ अधिकारी सतीश भदाणे, तलाठी दीपक एरंडे, उपस्थिती होती.मुख्याध्यापक भागवत कल्याणकर, टापरगाव सरपंच रूपाली मोहिते, हतनूरचे माजी उपसरपंच कैलासराव अकोलकर, साहेबराव अकोलकर, गंगाधर मोहिते, संतोष पवार आदीसह अंगनवाडी, आशा मदतनीस यांची उपस्थिती होती.











