मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या चौधरी कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम चौधरी यांनी हिवरखेड येथील सेंट पॉल अकॅडमी येथे भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
यावेळी सेंट पॉल अकॅडमीचे प्रिन्सिपल चंद्रकांत तिवारी यांनी वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या बाबत वसीम चौधरी सर यांच्याशी चर्चा केली.करोनाकाळात सर्वजण त्यांच्या स्तरावर विविध मानसिक तणावातून जात आहेत. यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांच्या काळात निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करून, त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यावर सखोल मार्गदर्शन वसीम चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात सांगितले तसेच लवकरच दहावीच्या परीक्षा सुरू होणार असून त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन अकोला येथील चौधरी कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम चौधरी यांनी केले.
यावेळी सेंट पॉल अकॅडमी चे प्रिन्सिपल चंद्रकांत तिवारी, डॉक्टर शकीलअली मिरसाहेब , तुळशीदास खिरोडकार , निखिल गिऱ्हे , रितेश टिलावत व शिक्षक वृंद यांनी वसीम चौधरी यांचा सत्कार केला.











