किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात घंटानाद आंदोलन सुरू
शासनाने जुन्या पेंशनची लवकर घोषणा केल्यास प्रसंगी सर्वोच्च न्यायालयातील याचिका सुद्धा मागे घेऊ- संगीताताई शिंदे
अकोला आझाद मैदानावरील बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलनाचा आज 77 वा दिवस
राजस्थान पाठोपाठ छत्तीसगड राज्याने जुनी पेंशन लागू केली, महाराष्ट्र राज्य केव्हा लागू करणार? – संगीताताई शिंदे यांचा प्रश्न
अकोला
“एकच मिशन, जुनी पेंशन, शिक्षक एकजुटीचा विजय असो” या घोषणां सह आज आझाद मैदान परिसर पेंशनमय झाला होता. जुनी पेंशन मिळण्यासाठी आज आझाद मैदानावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वात हे घंटानाद आंदोलन सुरू असून आज रोजी आझाद मैदानावरील बेमुदत महाविश्वास धरणे आंदोलनाचा आज 77 वा दिवस आहे. यावेळी आझाद मैदानावर प्रा.दिलीप डोंगरे, श्री. शरद तिरमारे, श्री.पंढरीनाथ धोंगडे नाना, श्री.सचिन पगार,श्री श्यामलाल प्रजापती, श्री एन प्रजापती, श्री रामकृष्ण झा, और श्रीमती वंदना खंडास्कर मॅडम, सेवानिवृत्त शिक्षक बांधव यासह बहुसंख्य शिक्षक बांधव व भगिनी आझाद मैदानावर उपस्थित होत्या.
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व कर्मचारी बांधवांना जुनी पेंशन मिळणे हा त्यांचा न्याय हक्क आहे. अशा शाळांना सरकारच 100% अनुदान वेळेत न देऊ शकल्यामुळे ती शिक्षक बांधवांची चुकी नसून ही शासनाची चूक आहे. जुन्या पेंशन बाबत सम्यक समितीचा अहवाल शासन दरबारी पोहोचला असून शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी तो अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडून शिक्षक व कर्मचारी बांधवांना जुनी पेंशन योजना लागू करावी अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी केली आहे.
जुन्या पेंशन बाबत 2 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होती परंतु महाराष्ट्र शासनाने आपले म्हणणे सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला 2 आठवड्याचा अवधी मागितला असून आता अंतिम सुनावणी 29 मार्च रोजी आहे. जर महाराष्ट्र शासनाने जुन्या पेंशनची घोषणा केल्यास सर्वोच्च न्यायालयातील याचिका सुद्धा मागे घेऊ असे मत संगीताताई शिंदे यांनी व्यक्त केले.
निद्रिस्त असलेल्या शासनाला झोपेतून जागे करण्यासाठी हे घंटानाद व भजन आंदोलन सुरू असून इतर राज्याचा आदर्श व कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून शासनाने जुनी पेंशन योजना लागू करावी. शिक्षक बांधव आता जुनी पेंशन योजना लागू झाल्याशिवाय व जुनी पेंशन योजनेचा निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नसून शासनाने कर्मचाऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी अन्यथा हे आंदोलन अधिकाधिक तीव्र केले जाईल असा इशारा शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी दिला आहे.










