विष्णुपंत भुतेकर यांचे प्रतिपादन
सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील वाकद येथे विठ्ठल रुक्मिणी संस्थानवर नामदेवराव चव्हाण यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डख, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, ह.भ. प.गणेश महाराज हुबांड, मनोज जाधव, संजय आण्णा जिरवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलतांना विष्णुपंत भुतेकर यांनी पंजाबराव डख यांचे कार्य शेतकऱ्यांसाठी देवदुता सारखे आसुन आपल्या अचुक हवामान अंदाजाने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादित केल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. लवकरच भूमिपुत्र कडुन वाशिम जिल्ह्य़ात पंजाबराव डख यांच्या मार्गदर्शनात निवडक शेतकर्यांची कार्यशाळा घेऊन हवामान विषयक जागृती केली जाणार आसल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी सांगीतले. पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना हवामान विषयक अत्यंत बारीक नैसर्गीक हलचालीचा अभ्यास, पीक नियोजन, पीकांची काळजी आणि भविष्यातील हवामान या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी वाकद आणि परिसरातील शकडो शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरूवातीला भगवान विठ्ठल रुक्मिणी चे पुजण करून पंजाबराव डख व विष्णुपंत भुतेकर यांचा मंदिर समितीकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन संतोषभाऊ ठाकुर यांनी केले. तर कार्यक्रमासाठी मान्यवर. सरपंच उद्धवराव जाळे, सुभाष मोरे, चंद्रपालसीहं ठाकुर, राजु ढोले, सुरेश लाटे, बाळासाहेब देशमुख, धन॓जय मोरे सह गावकऱ्यांनी परीश्रम घेतले.