सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी
अनसिंग : येथून जवळच असलेल्या एकांबा येथील युवक आनंद रतन चव्हाण यांची पोलीस उपनिरीक्षक पदी DT(A) categary all Maharashtra rank 3 निवड झाली आहे.एकांबा हे अतिशय छोटेसे गाव असून इथे कुठल्याही भौतिक सुविधा नाहीत स्वतःच्या परिश्रमाच्या भरोश्यावर या युवकाने गरुड झेप घेतली आहे या युवकाच्या यशाचे कौतुक करण्याकरिता गावातील सर्व लोकांनी त्याची मिरवणूक काढून ठिक ठिकाणी त्याचे स्वागत केले तसेच आनंद चव्हाण याचा आदर्श घेऊन गावातील सर्व युवकांनी यशाचे शिखर गाठावे अशी अपेक्षा गावकरी करीत आहेत आनंद चव्हाण यांच्या यशाचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे