किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : होळीच्या पर्वावर नैसर्गिक रंग स्वतः बनवून पर्यवरण पूरक होळी साजरी करण्याची शपथ पातुरच्या शेकडो विद्यार्थ्यांनी घेतली. किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली. अकोला येथील पर्यवरण प्रेमी शरद कोकाटे यांनी नैसर्गिक रंग कसे बनवायचे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे नैसर्गिक रंग बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून झी चोवीस तास चे प्रतिनिधी जयेश जगड, एबीपी माझा चे प्रतिनिधी उमेश अलोणे, शाळेच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी शरद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना बिट, पालक, हळद, पळस आदीपासून नैसर्गिक रंग कसे बनवायचे याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी शाळेच्या शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. संचालन वंदना पोहरे यांनी केले तर आभार नितु ढोणे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, सुलभा परमाळे, किरण दांडगे, अविनाश पाटील, अश्विनी अंभोरे, बजरंग भुजबटराव, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले










