अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगांव : संपूर्ण मातृशक्ती सह नारी शक्तीचा जागर अनोखा पद्धतीने महिला दिन संस्कार विद्या मंदिर मेडशी च्या वतीने साजरा करण्यात आला मुलगी जगून शिकली पाहिजे तेव्हाच मुलगी झाली प्रगती झाली असे म्हणता येईल आजची मुलगी उद्याची सशक्त शक्ती महिला आहे ती सक्षम झाली पाहिजे अशा अशांची लघुनाटिका सादर केली यावेळी ,विविध क्षेत्रातील कर्तबगार महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या, अध्यक्षस्थानी, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीताई तायडे या होत्या प्रमुखपाहुणे प,स,सदस्या, कौशल्याबाई साठे ,समाजसेविका प्रियाताई पाठक ,उपसरपंच सोनाली मंत्री ,माजी सरपंच रेखा मेटांगे, पोलीस पाटील ,अनिताताई चोथमल, सत्यभामाबाई घुगे,आरती आंधळे, मुख्याध्यापिका ,रूपाली पोदाडे,या होत्या,सूत्रसंचालन, अनिता फलटणकर, यांनी तर आभार प्रदशन राठोड मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील लहान चिमुकल्यांनी तसेच त्या पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती. आणि नेहमीच अशे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत असल्यामुळे संस्कार विद्या मंदिर हे गावातली तसेच परिसरातील लोकांचे आवडती शिक्षण संस्था बनली आहे.