महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : गुरुवारी लागलेल्या निकालात देशातील चार राज्यांत भाजपाला मिळालेल्या घवघवीत यशाचा विजयी जल्लोष येथील भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला. पेट्रोल पंप चौक व गांधीं चौक येथे फटाके फोडण्यात आले.द्रावती येथे चार राज्यात विजय मिळवल्याबद्दल विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गुंडावार, किशोर गोवारदीपें, विजय वानखेडे, प्रशांत डाखरे, संजय वासेकर, सुनील नमोजवर, माधव बांगडे, केशव लांजेकर, गजानन कामातवार, गोपाल गोसावाडे, अनंता मांढरे, तोशीब शेख, उमेश शहा, पवन हुरकट, गोविंदा बिंजवे, गोपाल गोस्वाडे, रामकृष्ण मेंढे, विनोद उपगनलावार, संजय राय, विजय माथणकर, शत्रुघ्न पुल्लरवार, संजय निवलकर, शंकर कलणडी उपस्थित होते.











