सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी
मेहकर तालुक्यातील कल्याणा येथील उद्धव पंढरी गरोळे (38) याच्या घरात गुटखा साठवला असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून “एलसीबी’ला मिळाली होती. काल दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या राहत्या घरी छापा मारून 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याला ताब्यात घेत मेहकर पोलिसांकडे सोपविण्यात आले. दुसरी कारवाई बदनापूर येथे करण्यात आली. अश्रूबा दादाराव असोले याच्या घरात गुटखा साठवला होता. “एलसीबी’ला याची कुणकुण लागली होती. त्याच्या घरी छापेमारी केली असता गुटख्याचे मोठे घबाड मिळून आले. घरातून 3 लाख 90 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. एलसीबीच्या कारवाईची भणक लागताच आरोपी आसोले मात्र फरार झाला. या कारवाया कर्तव्ययदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे(बुलडाणा), हेमराजसिंह राजपूत (खामगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली “एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक मनिष गावंडे, पोहेकाँ सुधाकर काळे, पो.ना. संजय नागवे, पोकाँ गणेश शेळके, चालक पो.काँ. सुधाकर बरडे यांनी पार पाडल्या.


