सोहळ्यात खासदारांना डावलले
सर्व योजनांचा आयताच लाभ भाजपा उचलत असल्याचा आरोप
वृषभ दरोडे
तालुका प्रतिनिधी राळेगाव
दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदारांनी तीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तालुका आरोग्य अधिकारी राळेगांव कार्यालयातील प्रागंणात थाटात पार पाडला,यावर शिवसेना राळेगांव तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे यांनी विद्यमान खासदार भावनाताई गवळी (पाटील) यांना का आमंत्रित करण्यात आले नाही असा संतप्त सवाल सबंधितांना केला आहे. सर्व सोशल मिडिया वर एका राजकीय नेत्याच्या जयंती वर्षा निमित्ताने हा सोहळा संपन्न झाल्याने,शिवसैनिकांचा रुद्रावतार बघावयास मिळाला.महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना अद्यावत रुग्णवाहिका दिल्यात.या लोकार्पण सोहळ्या साठी सबंधितांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करणं,गरजेचे होते. पण विद्यमान आमदारांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह या तीन अद्यावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. या आधी सुध्दा असाच राजकीय लाभ सबंधित घेत असून,निर्णय महाविकासआघाडी शासनाचे असल्याने
ही बाब कितपत योग्य आहे?महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे हे शिवसेने चे आणि काँग्रेस,राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन पक्ष सत्तेत असताना,स्थानिक खासदारांना साधं निमंत्रण देण्याचं सौजन्य देखील सबंधित अधिकाऱ्यांनी दाखवली नसल्याची खंत शिवसेनेची आहे.या वेळी तालुका आरोग्य अधिकारी राळेगांव यांना जाब विचारण्यासाठी शिवसेना राळेगांव तालुका प्रमुख विनोदभाऊ काकडे,राकेशभाऊ राऊळकर,संदीपभाऊ पेंदोर,योगेशभाऊ मलोंडे,महेंद्रभाऊ तूमाने सह अन्य शिवसैनिक उपस्थित होते…


