लोकप्रतिनिधी यांची पोकड आश्वासन.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
ब्रम्हपुरी(२६ जून)- ब्रम्हपुरी तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेला लाडज हा गाव अतिदुर्गम गाव असून या रस्त्याने चिखलगाव ते लाडज जाणार हा मुख्य रस्ता असून या रस्त्याची खूप दुरवस्था झालेली असून या कडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाची कुठली लक्ष दिसून येत नाही. या मार्गांनी चिखलगाव येथील नागरिकांच्या शेती असून त्यांना या रस्त्यांना बैलगाडी येजा करण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते. आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे व या अश्या ऋतूत जिथं तिथं खड्यात पाणी भरून असतो त्यामुळे प्रवास कारणांनी जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे मात्र या कडे कुणाचीही अजुन लक्ष नाही. मात्र निवडणुका तोंडावर आल्या की लोकप्रतिनिधी मात्र पोकड आश्वासन देऊन जातात व निवडून आल्यावर या गावाकडे कुणाचीच लक्ष दिसून येत नाही. तेव्हा शासनाने व लोकप्रतिनिधी ने लाडज ते चिखलगाव या रस्त्याची समस्या गांभीर्याने लक्षात या रस्त्याची नूतनीकरण करण्यात यावी अशी मागणी लाडज येथील नागरिकांनी केली आहे.


