सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी
मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नगर पालिका मेहकर,ग्रामीण रुग्णालय आणि जिल्हा समाज कल्याण विभाग जी. प. बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे
दिव्यांग(अपंग)व्यक्ती यांना लसीकरण केंद्रावर प्रथम प्राधान्य देण्यात येवून यांना केंद्रावर तासनतास ताटकळत न थांबता आल्या आल्या रॅपिड तपासणी आणि कोरोना लस देण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येईल. 24जून रोजी दिव्यांग लसीकरण करण्याबाबत दिव्यांग लसीकरण मोहीम चे मेहकर तालुका समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके,मेहकर नगरपालिका मुख्याधिकारी श्री सचिन गाडे व मेहकर ग्रामीण रुग्णालय. चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी.ठोंबरे यांची चर्चा होवून दिव्यांग लसीकरण दि.28/06/2021ते03/07/2021 सोमवार ते शनिवार या काळात प्राधान्याने दिव्यांग लसीकरण 18वर्षांवरील दिव्यांग व्यक्ती चे लसीकरण करण्याचे ठरले.त्यानुसार मेहकर शहरातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीचे/100टक्के
लसीकरण होईल.यासाठी मेहकर.शहरातील सेवाभावी संस्था,समाजसेवक,तरुण,शिक्षक,.अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, न. पा. कर्मचारी,अधिकारी,हे या सप्ताहात100%सहकार्य करतील.असे. न.पा. मुख्याधिकारी श्री सचिन गाडे म्हणाले.
आलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तीला रांगेत न थांबवता ताबडतोब लस दिल्या जाईल.असे मेहकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी.ठोंबरे .यांनी
सांगितले.
दिव्याग लाभार्थी यानी येताना अपंग प्रमाणपत्र आधारकार्ड व मोबाईल सोबत आणावे
अशी सूचना आरोग्य विभाग यांनी दिली.
तरी मेहकर येथील सर्व दिव्यांगाने या संधीचा लाभ ध्यावा असे आवाहन दिव्यांग लसीकरण मोहीम चे तालुका समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी केले आहे