अभिजीत फंडाट
प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका कार्यकारणीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ बु. व प्राथमिक आरोग्य केंद्र हातरूण येथे निवेदन सादर करण्यात आले आहे त्यावेळी उपस्थित पत्रकार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका अध्यक्ष अंकित क-हे, बाळापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश घ्यारे, तालुका उपाध्यक्ष प्रभुदास आवारे, तालुका कोषाध्यक्ष विष्णु वराळे, तालुका सचिव शुभम ताले, तालुका सहसचिव अभिजित फंडाट, तालुका संघटक पुरूषोत्तम घ्यारे, पत्रकार देवराव परघरमोर, यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ बु.व हातरूण येथील वरीष्ठ डाॅक्टर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे त्यामध्ये पत्रकारांना तातडीने लस उपलब्ध करून देणे पत्रकारांना गैरवागणुक न देणे पत्रकारांना वयाची अट नसावी या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहे .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका कार्यकारणीच्या वतीने आतापर्यंत जवळपास अनेक कामे करण्यात आले असून आता देखील बाळापूर तालुक्यातील गावा गावात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे तसेच महाराष्ट्रातील सर्व पत्रकार एकुण जवळपास २००ते ३०० पत्रकार कोरोनाने मृत्यू पडले असून शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र अध्यापही प्रशासन सुस्त अवस्थेत असल्याचे दिसून येते आहे म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई) बाळापूर तालुका कार्यकारणीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ बु.व प्राथमिक आरोग्य केंद्र हातरूण येथे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे अशी माहिती बाळापूर तालुका अध्यक्ष अंकित क-हे यांनी माहिती दिली आहे .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई बाळापूर तालुका अध्यक्ष अंकित क-हे
शुक्रवारी सकाळी १० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ बु.व प्राथमिक आरोग्य केंद्र हातरूण येथे पत्रकारांना तातडीने लस उपलब्ध होण्यासाठी लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे तरी सबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रशासनाने याची दखल न घेतल्यास आरोग्य मंत्री यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे अशी माहिती बाळापूर तालुका अध्यक्ष अंकित क-हे यांनी दिली आहे
बाळापूर तालुका उपाध्यक्ष सुरेश घ्यारे
महाराष्ट्रातील जवळपास २००ते ३०० पत्रकार आतापर्यंत कोरोनाने मृत्यू पडले असून त्यांना कोवीड लस उपलब्ध नाही झाल्याने पत्रकार मृत्यू पडले अाहे तरी सर पत्रकारांना तातडीने कोवीड लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी व्यक्त केली जात आहे सुरेश घ्यारे तालुका उपाध्यक्ष यांनी सांगितली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र उरळ बु.व प्राथमिक आरोग्य केंद्र हातरूण येथील डाॅक्टरांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता तातडीने कोवीड लस उपलब्ध करून घ्यावी अन्यथा आरोग्य मंत्री यांना देखील निवेदन सादर करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे