मुंबई : अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला अवघ्या काही तासातच ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याचं पोस्टरही काल रिलीज झालं होतं त्यालाही चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अमृता फडणवीस या नवनवीन गाणी घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.