राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
सिरोंचा – सिरोंचा तालुक्यातील दुबार पीक धान खरेदी तथा इतर समस्या सोडविण्यासाठी बाबत राहुल गुप्ता उपविभागीय अधिकारी (राजस्व) अहेरी यांना शिवसेना तर्फे मागणी करण्याचे निवेदन देण्यात आले. सिरोंचा तालुक्यातील शेतकरी मोठया प्रमाणावर दुबार धान पीक घेतात. सदर धान सरकारी पातळीवरून खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांचे धानाची नासाडी होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. शेतकरी कर्ज बाजारी झाल्याने पुनःश्च शेती करने अवघड जात आहे. शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या मार्गी जातील काय? असे काही घडू नये म्हणून सदर समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी किशोर पोतदार शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख, डॉ. रामकृष्ण मडावी माजी आमदार यांच्या नेतृत्वात आज दिनांक 24/06/2021 ला तहसील कार्यालय, सिरोंचा येथे राहुल गुप्ता उपविभागीय अधिकारी (राजस्व ) यांच्याशी चर्चा करून निवेदन द्वारे मागणी केली अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेण्यात येईल असे ही सांगण्यात आले. यावेळी सहसपंर्क प्रमुख विलास कोडापे, सहसपंर्क प्रमुख सुनील पोरेड्डीवार, अहेरी शिवसेना जिल्हाप्रमुख रियाज शेख, अहेरी विधानसभा प्रमुख अरुण धुर्वे, संघटक बिरजू गेडाम, जेष्ठ शिवसैनिक विलास ठोंबरे, दुर्गेश तोकला तालुकाप्रमुख सिरोंचा, महेंद्र शेंडे तालुकाप्रमुख, अमित यासलवार तालुकाप्रमुख, कल्पना तिजारे संघटिका तथा समस्त मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


