राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड(24 जून ) विषमुक्त उत्तपन्न घेण्यासाठी व आरोग्य सुदृढ राखण्यासाठी कमी खर्चाची सेन्दिंय शेती करण्याचे आव्हान उपविभागिय कृषिअधिकारी श्री आर.टी.जाधव यांनी केले. दिनांक 21 जून ते 1जूलै कृषिसंजीवनी मोहिमे अतंर्गत सुलेझरी(नागभिड) येथे आज आयोजीत कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.तांग, ठेंचा, अँझोला, सोनबोरू, आदी हिरवळीचे खताचा वापर करून शेतीची सुपिकता शेतकऱ्यांनी वाढवावी याबद्ल यावेळी श्री जाधव यांनी माहिती दिली. तर तालुका कृषिअधिकारी श्री एन.व्हि.तपासकर यांनी बिजप्रक्रिया 3% , मीठाची, 3% ग्राम थायरम प्रति किलो लावने, अझोटोबाँक्टर,पी.एस.बी, पट्टा पद्त धान लागवड, निंबोळी अर्क, कृषिक अँप, या विषयावर मार्गदर्शन केले.सुलेझरी येथील उत्कृष्ट शेतकरी यांचे शेतावर आयोजीत या कार्यक्रमाचे संचालन कृषिसहाय्यक श्री चदंनशिवे यांनी केले. तर आभार कृषिसहाय्यक श्री नवले यांनी केले.या कार्यक्रमाला बहुसंखेने शेतकरी उपस्थित होते.


