सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी कासारखेड
दि २३बुधवारी सायंकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे मेहकर तालुक्यातील पिंप्रीमाळी येथिल सुरेश इंगळे हे शेतातील नाला ओलांडताना बैलगाडीसह व बैल या नाल्या मध्ये वाहून गेली .त्यातिल एक बैल समॄध्दि महामार्ग च्या नाल्या मध्ये आढळून आला असून रितसर पंचनामा पशुवैद्यकीय अधिकारी करत होते तर दुसरा बैल अध्याय सापडला नसुन शोध सुरू आहे.समॄध्दि महामार्ग च्या अपुर्ण कामामुळे खटकाळीच्या नाल्याला मोठा पुर येत असुन ह्या शेतकऱ्यांचा शेतामध्ये पाणी तुंबलेल्या मुळे मोठें नुकसान होत आहे.संबंधित अधिकारी.ठेकेदार यांनी नाल्याच्या पाण्याची विल्हेवाट लावावी.शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.