किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे इयत्ता दहावी आणि बारावी साठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.आत्मविश्वास बाळगा परीक्षेला धैर्याने सामोरे जा कठीण परिश्रम आणि ध्येयनिश्चिती नक्कीच होते असे प्रतिपादन निरोप समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात सौ स्नेहप्रभादेवी गहिलोत यांनी केले.11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला येथील कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘मोबाईलचा वापर शस्त्र म्हणून करा’ आणि ‘ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील सर्वोच्च लोकांना भेटा आणि प्रेरणा घ्या’ याचे आवाहन केले. वेळेचे नियोजन करून परीक्षेला सामोरे जावे याचे मार्गदर्शन विजयसिंह गहिलोत यांनी केले.2021 मधील इयत्ता दहावी आणि बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे आणि मेमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींचे स्वागत तुळसाबाई कावल विद्यालय पातुर येथील एनसीसी कॅडेट्सनी मानवंदना देऊन केले केले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्ष स्नेहप्रभादेवी गहिलोत,अतिथी विजयसिंह गहिलोत, प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल सी पी भदोला कमांडिंग ऑफिसर 11 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोला, प्राचार्य एस बी ठाकरे, अंशुमनसिंह गहिलोत, अजितसिह गहिलोत, जगमोहनसिंह गहिलोत उपस्थित होते कार्यक्रमाचे बहारदार संचालन एस एस डोंगरे,आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन प्रा.पी पी वाकोडे यांनी केले प्रास्ताविक सुभाष इंगळे आणि आभार प्रदर्शन डॉ. ई. एस .सुर्वे यांनी केले.


