किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : पातुर तालुका विकास मंच व अखिल भारतीय माळी महासंघाने सहकार पॅनल चे विजेता प्रमोद काळपांडे यांना शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी पातुर तालुका विकास मंच चे किरण कुमार निमकंडे तसेच माळी महासंघाचे सुनील वावगे उपस्थित होते सहकार पॅनल अकोला जिल्हा प्रमुख दिलीप अंधारे सह प्रमुख अरुण वानखडे , साहेबराव पातोंड , रमेश तायडे, विजय भोरे, शंकर डाबेराव, गजानन पटोकार,केशव मालोकार,यांच्या मार्गदर्शनात 9 संचालका पैकी शशीकांत गायकवाड हे अध्यक्ष तर प्रमोद उपाध्ये हे जिल्ह्या उपाध्यक्ष व उर्वरित सात संच्यालक अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील पदभार सोपविण्यात आला व पातुर तालुका शाखा प्रमुख प्रमोद काळपांडे यांना सोपविण्यात आली या पदग्रहण सोहळा पातूर शाखेच्या पटांगणात मोठ्या थाटाने संपन्न झाला दिलीप अंधारे व अरुण वानखडे यांनी सभेला संबोधन करत असताना सहकार पॅनलच्या कार्याबद्दल माहिती देताना त्यांनी सहकार पॅनल चे शिक्षकांचे हिताचे निर्णय घेतले जातील अशा प्रकारे उपस्थित पत्रकारांना माहिती दिली यावेळी, मांलवे सर , हाजी सैय्यद वसीम सर,निलेश काळे , देवानंद मोरे, सुरेश बंड, डॉ बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या अध्यक्षा वैशाली किशोर निलखन, आरीफ सर, अंभोरे सर, ढोकणे सर, यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रल्हादराव निलखन यांनी केले तर आभार प्रदर्शन देविदास अंधारे यांनी मानले जिल्हा परिषद शिक्षक व मराठी महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते