बाबासाहेब खरात
तालुका प्रतिनिधी अंबड
अंबड तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग बांधवांचे 5% राखीव सहायता निधी पडून आहे. जिल्हा परिषद कार्यालय जालना व पंचायत समिती कार्यालय अंबड या दोन्ही कार्यालयास वारंवार निवेदन देऊन सुद्धा संबंधित अधिकार्यांनी अपंग बांधवांच्या हितासाठी कोणतेही निर्णय अद्याप घेतलेला नाही. सध्या कोरोणा च्या काळात अपंग बांधव फार अडचणीत सापडलेले आहेत. पंचायत समिती कार्यालयाद्वारे अंबड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांना पत्र देऊन सुद्धा निधी वाटप होत नाही.
प्रहार जिल्हाध्यक्ष मा. विदूर लाघडे, व प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.विठ्ठल चव्हाण यांच्या सुचनेवरून अपंग बांधवांच्या या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी साहेबांनी अंबड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयास एक पत्र काढून दिव्यांग बांधवांचा ५% राखीव निधी तात्काळ वाटप करण्यात यावे अन्याय प्रहार च्या वतीने अंबड पंचायत समिती कार्यालयात साप छोडो आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाळासाहेब काळवणे (प्रहार युवा जिल्हाध्यक्ष जालना) यांनी आपल्या निवेदनाद्वारे केला आहे.
यावेळी, सुरेश खरात तालुकाध्यक्ष (प्रहार अपंग संघटना अंबड), संदीप धुळे (प्रहार जिल्हा सचिव जालना), अशोक जमधडे(संपर्क प्रमुख अपंग संघटना अंबड), आकाश थेटे (प्रहार युवा तालुकाध्यक्ष अंबड), राधेश्याम काळवणे, अविनाश पांजगे आदी उपस्थित होते.


