अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर :- पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या उमरा येथे खुलेआम बसस्टाॅप वरच वरली मटका अवैध रित्या चालू आहे. उमरा येथील बसस्टाॅप वरच अवैध रित्या वरली मटका चालत असल्याने. तसेच बसस्टाॅप लगतच सार्वजनिक विहीर आहे, तीथे पुर्ण गावातील महीला पाणी भरण्या साठी येतात.त्यांना सुद्धा यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.वरली मटका चालवणाऱ्या मालकाचे बसस्टाॅप वरच स्टेशनरी चे दुकान असल्यामुळे त्या दुकांना मधे वरली घेतली जाते. काही वर्षापूवी या अवैध रित्या वरली मटका चालवणाऱ्या मालकावर जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब यांच्या विषेश पथका कडुन कार्यवाही करुण गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासुन त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही.सकाळ पासुन तर रात्रि १० वाजेपर्यंत हा वरलीचा गोरख धंदा मोठ्या दिमाखात चालु असतो. उमरा येथील वरलीच्या धंद्यावर कार्यवाही का होत नाही. हया वरलीच्या दुकानाला पोलीस बंद का करत नाहीत. अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. या धंद्यामुळे गरीब मजुर वर्ग भीकेला लागत आहे. अक्षरशहा त्यांची लुट केल्या जात आहे. जनतेचे रक्षक करणाऱ्या पोलीसांना हि गंभीर बाब का दिसत नाही.संबंधित वरिष्ठांनी दखल घेऊन उमरा येथील बसस्टाॅप वरली धंद्या विरोधात कार्यावाही करण्यात यावी अशी कळकळीची मागणी उमरा येथील ग्रामस्थांकडुन होत आहे.










