भोई समाज संघटनेशी केली चर्चा
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 23:- महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य तथा नागपूर विभाग भोई समाजाचे प्रतिनिधी चंद्रलालजी मेश्राम यांनी भद्रावती येथील मच्छिद्र मच्छूआ सहकारी संस्थेला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत भोई समाजात समांतर विस्तृत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत विदर्भ भोई समाज संघटनेच्या अध्यक्षा सौ.रंजना पारशिवे होत्या. प्रथम संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चंद्रलालजी मेश्राम यांच्या रूपाने भोई समाजाला आयोगावर प्रथमच प्रतिनिधित्व मिळाले. याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी स्थानिक भोई समाज संघटनेचे पदाधिकारी सोबत भोई समाजाला भेडसावणारी दैनंदिन समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.समाजातील शैक्षणीक फायदे आहेत. जातींवर मिळणाऱ्या सवलतीचे फायदे घ्या व सर्व सामाज बांधवांनी समाजाच्या उत्थानासाठी एकत्र येऊन काम करावे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त सदस्य माजी न्याय मूर्ती व मच्छिमार भोई समाजाचे वरिष्ठ नेते चंद्रालाल मेश्राम यांनी ग्वाही दिली.याप्रसंगी विदर्भ भोई समाज आघाडीच्या रंजना पारशिवे, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र नागपुर, भारत नागपुरे,भोई समाज तालुका अध्यक्ष सुनिल पारशिवे, नगरसेविका, सुनील पढाल,शीतल गेडाम, उमाताई नागपुरे,अंजना पढाल,माधुरी गेडाम,मनोहर नागपुरे, सुनिल पढाल,अनंता मांढरे, आशिष कार्लेकर,संभाजी मांढरे,,टायगर ग्रुपचे रुपेश मांढरे,विनोद नागपुरे,गजानन कामतवार प्रवीण नागपुरे आदी उपस्थित होते.