विकास ठाकरे
तालुका प्रतिनिधी अकोला
अकोला : पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पातुर नंदापुर येतो जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे केलेल्या छापेमारीत पातुर नंदापूर च्या ६ जुगार यांना रंगेहात अटक करण्यात आली असून दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने केली आहे. जुगार खेळत असताना रंगेहाथ पकडलेल्या कार्यवाहीत आरोपी. अमोल देवानंद हाडोळे, अमोल भीमराव भगत, आदिलशहा अकील शहा, अवि महेंद्र आडोळे, आकाश तुकाराम भगत, व सोनू बाळू मनवर, या जुगार यांना जुगार खेळताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. जुगार याकडून बावन ताश पत्ते, ७३६० रुपये नगदी,३ मोबाईल फोन किंमत ३० हजार,३ मोटर सायकल किंमत १ लाख ६० हजार रुपये असा एकूण १ लाख ९७ हजार ३६० रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे. पिंजर पोलीस स्टेशन मध्ये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील, व त्यांच्या पथकाने केली आहे.


