बाबासाहेब खरात
अंबड प्रतिनिधी
शहापुर: – पञकारास हाणमारी करीत त्याच्याकडील 5 हजार रुपये व गळ्यातील अशोक चक्र काढुन घेतल्याची घटना दि.21 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अंबड जवळील डावरगाव फाटा येथे घडली आहे.
या विषयी सविस्तर माहीती अशी कि अंबड तालुक्यातील शहापुर येथील दैनिक पुढारी चे पञकार अशोक गायकवाड यांनी 10 ते 15 दिवसापुर्वी आपल्याला घराचे काम डावरगाव येथील घर बांधकाम करणारे मिस्ञी नेनु खंडागळे यास दिले होते.सदर मिस्ञीने घराचे काम अर्धवट सोडले होते त्यामुळे घरमालकाने त्यांचा संपुर्ण हिशेब करून पैसे देऊन टाकले होते.परंतु मिस्ञीने कामाच्या व्यतिरिक्त वाढीव रक्कम मागीतली असता ती देण्यास नकार दिल्याने दि.21 जुन रोजी दैनिक पुढारी चे पञकार अशोक गायकवाड व दैनिक बदलता महाराष्ट्र चे पञकार सिद्धार्थ उघडे हे मोटारसायकलीवरून शहापुर कडे परतत आसताना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नेनु खंडागळे, कृष्णा खंडागळे ,अकाश खरात व इतर चार जणांनी मोटारसायकल आडवुन अशोक गायकवाड यांस शिवीगाळ करून बेदम मारहाण करीत त्यांच्या खिशातील रोख रक्कम पाच हजार रूपये व गळ्यातील अशोक चक्र काढुन घेतले.व आमच्या विरोधात जर पोलीसात तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
तरी अशोक गायकवाड यांच्या फिर्यादी वरून अंबड पोलीस ठाण्यात नेनु खंडागळे, कृष्णा खंडागळे, आकाश खरात व इतर चार जणाविरूध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हेड काॅन्टेबल उत्तम माटकर हे करीत आहेत.