अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील स्वर्गवासी पुंडलीकराव गवळी कला व विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन चे प्राणीशास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख डॉ. सचिन तायडे यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. प्रा. डाॅ. सचिन तायडे हे मागील आठ वर्षांपासून स्व. पुंडलीकराव गवळी कला विज्ञान महाविद्यालय शिरपूर जैन येथे प्राणी शास्त्र विषयाचे सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आपले संशोधन कार्य 24 शोधनिबंधात द्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहे तसेच त्यांनी 76 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे व कार्यशाळांमध्ये सहभाग नोंदविला आहे. यापूर्वी बेंगाल मड इल या माशाची प्रजाती महाराष्ट्र, गोवा, गुजरात व कर्नाटक या चार राज्यांमध्ये सर्वप्रथम शोधण्याची नोंद त्यांच्या नावे आहे. या यशाचे श्रेय ते आई व भाऊ, महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक डॉ. के. एम. कुलकर्णी, राजस्थान महाविद्यालय वाशिमचे प्राणीशास्त्र विभागप्रमुख व त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. दिलीप दाभाडे, प्रोफेसर डॉ. हेमंतकुमार वंजारी व मित्र परिवार यांना देतात. त्यांच्या या यशाबद्दल महिला उत्कर्ष प्रतिष्ठान रिसोडच्या अध्यक्षा माननीय खासदार भावनाताई गवळी, प्राचार्य डॉ. डब्ल्यू, के. पोकळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुधीर खाडे, महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या मूळगावी मेडशी येथे त्यांच्या वर स्तुतीसुमने उधळून शूभेच्छा चा वर्षाव गावातील सर्व गटातील नागरिकांनी केला.