सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी कासारखेड
आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी रुग्णालय लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे राबवित आहे मेहकर तालुक्यातील कलंबेश्र्वर,जानेफळ,दे. माळी,डोणगाव, या प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रात 22जून रोजी दिव्यांग व्यक्ती उत्साहाने लसीकरण मोहीम मध्ये सहभागी झाले होते.
दिव्यांग लसीकरण मोहीम मध्ये मेडिकल ऑफिसर जानेफळ डॉ. स्वप्नील चव्हाण, कलंबेश्र्वर डॉ. देवानंद होणे,दे माळी डॉ. विशाल मगर,डोणगाव डॉ. अमोल गवई व स्टाफ यांनी आपुलकीच्या भावनेतून दिव्यांग लसीकरणाचे कार्यात योगदान देवून आलेल्या दिव्यांगास प्रथम प्राधान्य देवून लसीकरण करित आहे.
शासनाने आता 18 वर्षा वरील नागरिकांसाठी लसीकरण करण्यास परवानगी दिली असून आता 18 वर्षांवरील दिव्यांग व्यक्तीचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करून घेण्याबाबत आवाहन मेहकर तालुका दीव्याग लसीकरण मोहीमचे समन्वय अधिकारी प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी केले.
गावातील तरुण, समाजसेवक, सेवाभावी संस्था,ग्रामपंचायत,तलाठी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,शिक्षक वृद, व आरोग्य विभागाचे डॉकटर, नर्स व कर्मचारी यांनी आपल्या वार्डातील गावातील दिव्यांग व्यक्ती लसीकरण पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती प्राचार्य शेळके यांनी केली.
22जून रोजी या मोहिमेचे कार्यास सहभाग डोणगाव ला श्री शेख,शरद मुळे, सौ. लक्ष्मी जावरकर,जानेफळ ला आत्माराम दळवी,प्रमोद सावुरकर,दे.माळी ला सतिश जागृत, ओ के पुरी तर हिवरा आश्रम येथे प्राचार्य शेळके,सौ सुनीता गोरे यांच्या प्रयत्नाने व जागृती कार्यातून लसीकरण झाले.










