सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर स्थानिक देऊळगाव माळी येथील पत्रकारांच्या वतीने लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या मेहकर तालुका संघटक पदी रविंद्र सुरूशे यांची नियुक्ती झाल्याबद्दल लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार संजय जी खरात यांचे चिरंजीव गणेश खरात यांच्या शुभहस्ते पत्रकार रवींद्र सुरूशे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार शिवशंकर मगर पत्रकार तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांचा सन्मान लोकशाही मराठी पत्रकार संघटनेच्या मेहकर संघटक पदी नियुक्त झालेले रवींद्र सुरूशे यांचा सन्मान यानिमित्ताने करण्यात आला. यावेळी गावकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.


