नाना पटोले यांच्या बेताल वक्तव्य विरोधात FIRदाखल करा. भारतीय जनता पार्टी डोणगांव यांची मागणी.
सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
डोनगाव महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष यांनी १६ तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना अर्वाच्यशिवीगाळ केली आणि मी मोदी यांना मारु शकतो अशी धमकी दिली. देशाचे पंतप्रधानाला मारण्याच्या वक्तव्यामुळे नाना पटेले यांचे विरुध्द देश भरातुन भारतीय जनता पार्टिचे नेते व कार्यकर्ते आणि जनसामान्यांच्या भावना दुःखाल्या गेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षा कडुन नाना पटोले यांचेवर गुन्हे दाखल करण्या संदर्भातील महाराष्ट्रभरातून मागणी होत आहे.
नाना पटोले यांनी देशाच्या पंतप्रधान यांचा अपमान केला आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर गुन्हे दाखल करा या संदर्भातील मागणी डोणगांवचे भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते यांनी डोणगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, भाजपा जेष्ठनेते सदानंद पातुरकर, महीला तालुका अध्यक्षा ज्योतीताई बुरंखडे, युवा तालुका अध्यक्ष सागरभाऊ बाजड, शहर अध्यक्ष डोणगांव विलास परमाळे, अमोल बेदरकर, बबनराव भुजबळ, देवीदास चव्हान, जयपाल शर्मा, रामेश्वर पांडव तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.


