चंद्रपूर येथील शिक्षणाधिकाऱ्यांना पालकांच्या वतीने निवेदन
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि. 21 :- फि न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या चंद्रपूर येथील नारायणा विद्यालयाची मान्यता रद्द करावी. या मागणीला घेऊन पालकांची दि.१८ जून ला चंद्रपूर येथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर काळ्या पट्या लावून थाळीनांद आंदोलनकेले.वशिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.या प्रकरणाची तात्काल दखल घेत शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकला विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तात्काल सुरू करावे व विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात प्रमोट करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्राकातून देण्यात आली आहे सदर शाळेतील विद्यार्थ्यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे शैक्षणीक शुल्क भरले नसल्याने शाळा व्यवस्थापकाने विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले. व दूरध्वनीवरून पालकांना शैक्षणीक शुल्क भरण्याचा तगादा लावला मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार शैक्षणीक शुल्क भरले नसले तरीही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. सदर आंदोलनात पालक संघटक प्रमुख सचिन महाजन भूषण बंडावार, विवेक जोगी, पुरुषोत्तम आवडे, राकेश फुले, ब्रह्मानंद शेंडे, स्नेहल मत्ते, वैशाली टोंगे, मनीषा फुले, तथा जवळपास १५० पालक आंदोलनात सहभागी झाले होते.