किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
राजपुत संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यात वीस हजार दिनदर्शिकेचे वाटप
सण २०२२ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वीस हजार दिनदर्शिकेचे प्रकाशने भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कसल्याही प्रकारचे जाहिरात शुल्क न घेता समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ समाज सुधारक नागरिक यांचे समाजाप्रती असलेले कर्तव्य व प्रेम या दोन बाजू प्रकर्षाने मांडून ही दिनदर्शिका राजपूत समाज संगठन पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने सर्वांना निःशुल्क दरात उपलब्ध करून देण्यात आल्याचे संगठने अध्यक्ष ठाकूर शिवकुमार सिंह बायस यांनी सांगितले आहे.
दिनदर्शिका २०२२ प्रकाशनाला संगठनेचे सचिव श्रीराम परदेशी यांनी खुप मोलाचा वाटा उचलून अथक परिश्रम घेतले आहे.
प्रकाशन सोहळ्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी महापौर विद्यमान नगरसेविका डॉ.वैशाली घोडेकर,माजी महापौर विद्यमान नगरसेवक राहुलदादा जाधव, माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक तुषार हिंगे,महापालिका विरोधी पक्षनेता नगरसेवक राहुल भोसले, प्रभाग समिती अध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रभाग समिती अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेवक समीर मासुळकर,टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष सचिन लांडगे,नगरसेवक अंकुश मळेकर, नगरसेवक दिनेश यादव, नगरसेवक विशाल मासुळकर, उद्योगपती समीर भोसले,आण्णा भोसले, उद्योजक जितेंद्र सिंह राजपूत, श्रीराम सिंह परदेशी, अँड राजेश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.