महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१४:-येथील नगर परिषदेच्यावतीने चालविल्या जाणा-या शहर उपजिविका केंद्राने मकरसंक्रांतीच्या पर्वावर विविध कलाकृतीच्या वस्तुंचे स्टाॅल्स लावून शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले आहे.दिनदयाळ योजनेद्वारे राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ‘ब’ दर्जाच्या नगर परिषदांमधील भद्रावती येथील हे पहिले शहर उपजिविका केंद्र आहे. अडीच महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या या शहर उपजिविका केंद्रात शहरातील ७२ महिला बचतगटांना त्यांनी निर्माण केलेल्या वस्तुंच्या विक्रीकरीता हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.सध्या मकरसंक्रांतीचा सण असून या सणानिमित्त महिलांना लागणा-या ज्वेलरीच्या वस्तू, तीळगुळाचे लाडू, पापडी, इतर खाद्यपदार्थ, टेराकोटापासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, करंडे, पर्स, पायदान इत्यादी वस्तू स्वस्त दरात विक्रीस उपलब्ध आहेत. नगराध्यक्ष अनिल धानोरकर आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या शहर उपजिविका केंद्राची व्यवस्था शहर अभियान व्यवस्थापनाचे रफीक शेख आणि ज्योती लालसरे सांभाळत आहेत. तर समुदाय संघटक सुरेखा आस्वले, व्यवस्थापक संगीता गौरकार, सहव्यवस्थापक मनिषा ढोमणे यांचे सहकार्य लाभत आहे.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)