किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
दि. 21/06/2021
पातूर : राज्यातील इंधन दरवाढ व गगनाला भिडणाऱ्या महागाईविरोधात वंचित बहुजन आघाडी पातूर तालुक्याच्या वतीने तहसीलदार पातूर यांना निवेदन देण्यात आले.
एकीकडे कोरोनाने जीव जात आहेत आणि दुसरीकडे यातून जे वाचले त्यांचं जगणं महागाईने असह्य झाले आहे. “आपण सर्वजण सध्या न भूतो न भविष्यतो” अशी अशी महागाईची झळ झेलत आहोत.यामुळे कोरोनातून जे जगलेत त्यांचेही जीवन महागाईने असह्य केले आहे.वैद्यकीय खर्चात नागरिकांची या महामारीत लूट झालीच आहे व आता स्वस्त किमतीत जीवनावश्यक वस्तू पुरवणे तर दूरच पण त्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.या महामारीत पोषक आहार घेऊन रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याऐवजी उपासमारीची वेळ आली आहे.त्यातच कित्येकांच्या होता त्या नोकऱ्याही गेल्या.त्यासाठी झोपलेल्या व
मोदी सरकार आणि आघाडी सरकारला जागं करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तहसील कार्यालय पातूर येथे निदर्शने करण्यात आले व सरकारने तत्काळ महागाई कमी करून त्यावर नियंत्रण आणावे अश्या मागणीचे निवेदन मा. राष्ट्रपती महोदय यांना तहसीलदार पातूर यांच्या मार्फत देण्यात आले.यावेळी निर्भय पोहरे(तालुकाध्यक्ष वं.ब.आ.) राजेश महल्ले,स्वप्निल सुरवाडे(ता.प्रसिद्धी प्रमुख),राजू तायडे,अर्जुन टप्पे,सुनील फाटकर,अलकाताई सदार(तालुकाध्यक्ष महिला आघाडी),विनोद देशमुख,डॉ.ओमप्रकाश धर्माळ, मंगेश गवई,इब्राहिम पटेल,करुणाताई गवई,उमेश गवई, बंडू राठोड,दशरथ सदार,नागेश करवते आदी उपस्थित होते.


