उन्नती फिल्म प्रोडक्शने दिली शेकडो कलाकारांना चित्रपटात झळकण्याची संधी..
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर : नुकत्याच काही दिवसापूर्वी क्राइम पेट्रोल मध्ये फैजल कुरेशी यांची भूमिका साकारून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अकोला जिल्ह्याचे नाव शिरपेचात नेणारे पातुर येथील रहिवासी व अकोला येथे वास्तव्यात असलेले अभिनेते राहुल सुरवाडे यांनी इतरांपेक्षा आपण काही वेगळे दाखवण्याची जिद्द व अभिनयाचा कोणताही वारसाहक्क नसलेले अकोल्याचा राहुल सुरवाडे हा अभिनयाच्या जोरावर दिग्दर्शक बनला.त्यांच्या कामाची सुरुवात 2009 मध्ये करीत असतांना अनेक अडचणी आल्या चित्रपट कुठे बनतात, निवड कशी होते. याबद्दल कसलीही कल्पना नसताना देखील ध्येयवेड्या राहुल सुरवाडे यांनी मुंबई गाठली घरच्यांचा विरोध असताना सुद्धा धुंद होऊन सर्वांपेक्षा वेगळे करण्या साठी रेल्वे स्टेशन वर राहून वडापाव खाऊन दिवस काढणारे राहुल सुरवाडे हे पातुर तालुक्यातील मूळ भंडारज गावचे या बारा वर्षाच्या प्रवासामध्ये खचून न जाता त्यांनी क्राइम पेट्रोल सोनी टीव्ही मध्ये हवालदार, भिकारी व फैजल कुरेशी यांच्या भूमिका केल्या राहुल सुरवाडे एक कलाकारच नाहीतर डायरेक्टर, कॅमेरामन , कास्टिंग सुद्धा करतात.पातुर सारख्या ठिकाणी बालपण व शिक्षण घेतलेल्या राहुलने चंदेरी दुनियेत चांगलीच मजल गाठली. वडील हेडकॉन्स्टेबल आई गृहिणी दोन बहिणी एक धाकटा भाऊ यांनी राहुल दिग्दर्शक बनेल याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. मात्र कुणाच्या नशिबात काय लिहून ठेवलेले असते कोणालाच माहीत नसते. बघता-बघता अभिनयाच्या जोरावर कित्येक लोकांना कामे दिली अभिनेता राहुल सुरवाडे यांनी रेबिन, वेड ,एक ऐसी भी जिंदगी है ,व्हॅल्युएशन ऑफ तिरंगा, इतकेच नाही तर कोरोना काळात ‘ती’ नावाचा लघुचित्रपट प्रदर्शित केला.वेळ हा चित्रपट शेतकऱ्याची आत्महत्या वर आधारित आहे तर ‘रेबिन’ हा चित्रपट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मुंबई,नवी मुंबई, नाशिक येथे प्रदर्शित झाला होता.व राहुल सुरवाडे यांना उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. अभिनेता राहुल सुरवाडे यांनी पूर्वी ‘एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा’ या सोनी टीव्हीवरील अभिनय चांगलाच चमकला होता.नंतर त्यांनी ‘द वर्ल्ड इन कॉपरेट लाईक’, नई भोर, व चेहरा इत्यादी चित्रपटांमध्ये अभिनेता सुरवाडे यांनी अभिनय केला. चेहरा या चित्रपटातील त्यांनी केलेली एक वनाधिकाऱ्यांची भूमिका चांगलीच गाजली अभिनेता राहुल सुरवाडे यांची मुलगी उन्नती सुद्धा अभिनय क्षेत्रात उतरली आहे .हे दोघेही आता मराठी चित्रपटात काम करीत आहेत. या चित्रपटात 72 मैल एक प्रवास या चित्रपटावरील अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या सोबत काम केला आहे. राहुल सुरवाडे यांनी गिनीज बुक सारख्या रिॲलिटी कार्यक्रमात सुद्धा थेट धडक मारून अकोल्याच्या नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले.अभिनेता राहुल सुरवाडे यांचे स्वतःचे नागपूर येथे फिल्म प्रोडक्शन सुद्धा आहे त्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांना त्यांनी नवी दिशा देण्याचे काम केले व अभिनय क्षेत्रात उंच भरारी मारण्याची उन्नती फिल्म प्रोडक्शन अहोरात्र काम करत आहे राहुल सुरवाडे सध्या क्राइम पेट्रोल मध्ये काम करत आहेत. सध्या ‘डू नॉट थिंग्स’ ही मराठी शॉर्ट फिल्म लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे अभिनेता तथा दिग्दर्शक राहुल सुरवाडे यांनी स्पष्ट केले.त्यांचे आगामी चित्रपट मराठी फिचर फिल्म पंचर पिंट्या, लाईफ हे करण्याच्या मार्गावर आहेत.त्यांच्या यशाचे श्रेय ते त्यांच्या पत्नी स्वाती सुरवाडे व अभिनेते सहीम खान यांना देतात.उत्कृष्ट सिनेकलाकार होण्यासाठी तुम्हाला पैसा,वशिला,सौंदर्य, शिक्षणाची गरज नाही तर उत्तम अभिनयाची क्षमता असणारा साधा माणूस सुद्धा अभिनेता होऊ शकतो असे प्रतिपादन अभिनेता राहुल सुरवाडे यांनी केले.


