मुंबई : राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महसूलमंत्र्यांच्या कार्यालयात कोरोनाग्रस्त सापडल्यानंतर गृहमंत्र्याच्या कार्यालयात २० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सापडले आहेत. आता मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील २२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. बायोमेट्रिक हजेरी देखील कोरोनाच्या भितीने बंद अधिवेशनानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय नेते मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित सापडले आहेत, त्या नंतर हे लोण मंत्रालयात पोचले सून मंत्रालयात बायोमेट्रिक हजेरी देखील कोरोनाच्या भितीने बंद करण्यात आली आहे. आता मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.


