सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी कासारखेड
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने सुमारे २७२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान होत आहे. त्यामुळे २८९ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान होत आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचनाही दिल्या होत्या. मात्र यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने आमदार संजय रायमूलकर यांनी
पेनटाकळी धरणाच्या पाण्यातच आज, २१ जूनला सकाळी ११ पासून आंदोलन सुरू केले होते. सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन चालले. पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी आमदार रायमूलकर यांच्याशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दोन दिवसांत प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ‘पाटबंधारे’चे कार्यकारी अभियंता रायमूलकरांना भेटण्यास आले होते. त्यांनीच त्यांचे बोलणे अधीक्षक अभियंत्यांशी करून दिले. महिनाभरात हा प्रश्न मार्गी न लागल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरुपाचे आंदोलन शेतकरी, महिला, मुला-बाळांना घेऊन २० जुलैला करू, असा इशारा रायमूलकर यांनी यावेळी दिला.


