तर अतिसंवेदनशील कामामध्ये होमगार्ड यांची महत्त्वाची भूमिका
होमगार्ड करत आहेत खुपीयांची कामगिरी
जो देईन मनी त्याच्या ड्युटी ची हमी
जो नाही देत मनी तो फक्त ड्यूटी च्या कामी
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोणाचे संकट ठिय्या देऊन आहे.कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता,आपत्कालीन व्यवस्थापन,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता प्रशासनाने अवघ्या महाराष्ट्रभर.पोलीसांच्या मदतीला होमगार्ड कर्मचारी कर्तव्यावर तैनात केले आहे.तसेच अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा ऑनलाईन यादीनुसार 700 होमगार्ड गेल्या वर्षभरापासून कर्तव्यावर आहेत.कर्तव्य करत असतांना काही पोलीस स्टेशन मधे असे निदर्शनास आले आहे की.काही कामचुकार , अट्टल ठगे, होमगार्ड सैनिक आपला वसिला हजेरी मेजर कडे लावुन आपली ड्युटी वाट्टेल त्या ठिकाणी काही आर्थिक देवान घेवान करुन लावुन घेतात.तर काहीजण ट्राफिक पोलीसांसोबत आपली एक्स्ट्रा मिळत मिळवण्याकरता हजेरी मेजर कडे वसिला लावतात.असेच काही दिवसांपासून पातुर पोलीस स्टेशन मधे चित्र घडतांना दिसत आहे.बोटावर मोजण्या ईतकेच होमगार्ड इमानेइतबारे कर्तव्य बजावत आहेत.तर फिक्स पाॅईडच्या नावावर मन पसंत,मनमर्जीतील काही होमगार्ड गेल्या फेब्रुवारीपासून गेल्या (4) महिन्यापासून एकाच ठिकणी आपल्या अॅन्डराँईड मोबाईल मधे मग्न आसतांना दिसतात.त्यांना दुसरीकडे
बदलल्या गेले नसुन आर्थिक देवाव- घेवान करुन जागेवच जैसे थे आहेत.ग्रामीण भागातील काही सैनिक पोलीस स्टेशनला मात्र नेहमी ड्युटी करतांना दिसतात.तर काही ठगे , महाशय गैरहजेरी लावुनये याकरिता हजेरी मेजर ला पैशाचा वसिला सुद्धा लावता. ठाणेदाराचा वचक नसल्याने ठग्यांची मज्जास मज्जा आहे.
परंतु या सर्व गोष्टी ठाणेदारां पर्यंत पोहचत नसतील का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. ठाणेदेराच्या डोळ्यावर विश्वासाची पट्टी बांधून मनमर्जीतील एका होमगार्ड ला सोबत घेऊन अवैध धंद्याची सर्रास वसुल सुद्धा केली जात आहे.
ह्या गंभीर बाबीकडे स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार व होमगार्ड्स जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.