किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
सावित्रीबाई फुलेना आगळी वेगळी आदरांजली
पातूर : येथे महाराष्ट्र राज्य माळी युवक संघटनेचे वतीनेक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून चष्मे वाटप व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून आगळे -वेगळे अभिवादन करण्यात आले. पातूर येथील श्री सिदाजी महाराज सभागृह येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार लक्ष्मणराव तायडे हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून नगर परिषदचे गटनेते हाजी सय्यद बुऱ्हाण भाई, होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक राजूभाऊ उगले, तुळसाबाई गाडगे, किड्स पॅराडाईजपब्लिक स्कूलचे अध्यक्ष गोपाल गाडगे, डॉ तुळशिराम ढोणे, जेष्ठ पत्रकार देवानंद गहिले, शेख मुख्तार शेख अहमद, सचिनभाऊ ढोणे, शामरावजी बारताशे,विजू भाऊ हिरळकार, योगेश इंगळे, युवा नेते अभिलाष तायडे, मोहम्मद शारिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी छोटी सावित्री वैष्णवी अनिल बरताशे या चिमुकलीने मी सावित्री बोलते एकपात्री सादर करून रसिकांची मने जिंकली.
यावेळी तीनशेच्या वर गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच शंभर रुग्णावर नेत्रशास्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत बारताशे यांनी केले तर
आभार अभिलाष तायडे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र माळी युवक संघटनेच्या काही नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्येतालुका सोशल मीडिया प्रमुख पंकज वालोकार, शहर उपाध्यक्ष नयन ढोकणे, शहर सचिव कैलाश शंकरराव पाटील, कोषाध्यक्ष शंकर चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक कैलास शामराव ठक, सहसचिव सागर माहुलीकर आदींची निवड करण्यात आली. आदींना मान्यवरच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे सचिव जीवन ढोणे, शहराध्यक्ष डिगांबर फुलारी, अमोल गाडगे,सचिन परमाळे, दिलीप इंगळे,शंकर पाटील, महेश सौंदळे,ऋतिक बारतासे, पंकज वालोकार, नयन ढोकणे, कैलास ठक, सुमित बारतासे,योगेश शिरसागर, अनिकेत उमाळे आदींनी परिश्रम घेतले.


