सोनेराव गायकवाड
तालुका प्रतिनिधी,लातूर
लातूर: लातूर येथे दिनांक ४ जानेवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात लोकाधिकार संघाच्या लातूर महानगरप्रमुख पदी भारतराव बिराजदार यांची तर चाकूर तालुकाप्रमुख म्हणून ओम हाळे यांची नियुक्ती लोकाधिकारप्रमुख श्री. व्यंकटरावजी पनाळे यांनी केली.
याप्रसंगी भारतराव बिराजदार आणि ओम हाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
लातूर येथे आयोजित लोकाधिकार वर्धापन दिन नियोजन बैठकीत ही निवड करण्यात आली. येत्या १२ जानेवारी २०२२ रोजी लोकाधिकार संघाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित नियोजन बैठकीत ही निवड घोषित करण्यात आली. या वेळी लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हाप्रमूख श्री. विरनाथ आंबूलगे, जिल्हा उपप्रमुख माधवराव तोंडारे, संतोष पनाळे, लोकाधिकार वार्ता चे औसा तालुका प्रतिनिधी महादेव जगदाळे, सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी नियुक्तीनंतर भारतराव बिराजदार व ओम हाळे यांनी लोकाधिकार संघटना घरा घरात पोहोचवण्याचे काम आपण करणार असून लोकाधिकार च्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवु असे मनोगत व्यक्त केले.