शरद भेंडे
ग्रामीण प्रतिनिधी
अकोट : दि .४जानेवारी ला पंचायत समिती अकोट येथे यु.डी.आय.डी.कार्ड वाटपाचा कार्यक्रम सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभाग अकोला तर्फे घेण्यात आला. सदर कार्यक्रम स्व.मोतीरामजी चिंचोळकर मुकबधिर विध्यालय आकोट यांच्या मार्फत राबवण्यात आला. कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक दत्तात्रय चिंचोळकर विशेष शिक्षक चिंचोळकर सर, नागरे सर, राऊत सर ,शेगोकार सर ,भागवत सर, गायकवाड, केवदे, डाबेराव ,निशाणे, नाथे उपस्थित होते. तसेच विषेश सहकार्य करीता राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अकोट तालुकाध्यक्ष नरेंद्र जगन्नाथजी कोंडे,तालुका उपाध्यक्ष अनिल राऊत ,महिला आघाडी शहराध्यक्ष ललिता नाथे तालुका अध्यक्ष वंदना इंगळे शहराध्यक्ष जब्बार शहा उपाध्यक्ष रहुफ शहा ,सचिव गुलाब कात्रे उपस्थित होते. दिव्यांगाना कार्ड वाटपा च्या कार्यक्रम करीता विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमातुन सर्व दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन पुंड साहेब जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले.


