राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली शहर हे जिल्ह्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे. येथील समस्या स्थानिक आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचा लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या विकास निधीच्या 25-15 या विशेष योजनेतून आलापली शहराला 1 करोड रुपये निधी देऊन एकूण 30 कामे मंजुरी करण्यात आले. यात सिसि रोड व नाली बांधकाम साठी अंदाजे 40 लक्ष रुपये अदा केले. पहिल्या टप्प्यात एकूण 6 कामाचे उद्घाटन करून आज दुसऱ्या टप्प्यातील अंदाजे 17 कामा पैकी चार कामाच्या लोकार्पण तसेच 13 कामाच्या उद्घाटन सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. कामाला प्रारंभ होऊन काही कामे झाले आहे व काही कामे प्रगतीपथावर आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम, माजी नगरसेविका ममता पटवर्धन, सुचिता खोब्रागडे, आलापल्ली ग्रा.प चे युवा सरपंच शंकर मेश्राम, उपसरपंच विनोद अक्कनपलीवार, पेसाअध्यक्ष स्वामी वेलादी, उपाध्यक्ष प्रीती ईस्टाम, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रा. प.सदस्य पुष्पा अलोने, माया कोरेत, अनुसूर्या सपीडवार, सोमेश्वर रामटेके, मनोज बोलुवार, संतोष अरका, स्वप्निल श्रीरामवार, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, वासुदेव पेदिवार , पराग पांढरे, किरण सल्लम, विशेष भटपलीवार व आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आलापल्ली शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.











