अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
कार्ली येथील उपकेंद्र मध्ये काल रात्री तोरणाला येथील काही ग्रामस्थांनी कार्यालयात येऊन लाईट नेहमी च कशी जात राहते अशी विचारणा करून उपकेंद्र कार्यालयातील मधील प्लॅस्टीकच्या खुर्च्या, व काठीने सब स्टेशन मधील काचेच्या खिडक्या , ३३ के.व्ही . कंट्रोल पॅनलचे काच फोडुन नुकसान केले व आम्ही समजाविण्यास गेलो असता आम्हाला सुध्दा लोटलाट करून शिवीगाळ केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. अशी माहिती ठाणेदार पोलीस स्टेशन जउळका यांना दिली असता कुठलाही विलंब न करता पोउपनि. राजेश पंडित व किन्ही राजा पोलीस चौकी तील कर्मचारी यांनी घटना स्थळी येऊन स्थळाची पाहणी केली. व फिर्यादी कनिष्ठ अभियंता यांनी जबानी रिपोर्ट दिला की , फिर्यादी हे कनिष्ठ अभियंता ( MSEDCL ) या पदावर कार्यरत असुन त्यांच्या कडे ३३ के.व्ही . जउळका , किन्हीराजा , कार्ली सब स्टेशनचा चार्ज आहे . दिनांक १८/०६/२०२१ रोजी रात्री ८.३० वा फिर्यादी हे कार्ली सब स्टेशन येथे त्यांचे सहकारी नामे हर्षल प्रल्हाद खंडारे ( तंत्रज्ञ ) , नारायण परसराम नवघरे ( बाहय स्त्रोत यंत्र चालक ) , अमोल शालीक पाटील ( चौकीदार ) असे हजर असताना तोरनाळा येथील रवि चौधरी , जगदेव सावके , महादेव चौधरी , महादेव कंकाळ व तोरणाळा येथील काही इसम हे कार्ली सब स्टेशन कार्यालयामध्ये आले व फिर्यादी याला म्हणाले की , लाईन नेहमी कशी काय जाते असे म्हणुन यातील नमुद आरोपीतानी सब स्टेशन मधील प्लॅस्टीकच्या खुर्ची , काठीने सब स्टेशन मधील काचेच्या खिडक्या , व ३३ के.व्ही . कंट्रोल पॅनलचे काच फोडुन नुकसान केले . फिर्यादी हा समजाविण्यास गेले असता त्यांना सुध्दा लोटलाट करून शिवीगाळ केली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला . अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा कलम ३५३,३२३,५०४,५०६,३४ भादवी सहकलम ३ सार्वजनीक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १ ९ ८४ प्रमाणे दाखल करून तपासात घेतला . सदर गुन्हयातील आरोपी नामे १ ) रवि सोपान चौधरी वय २७ वर्ष २ ) महादेव निळकंठ चौधरी वय ३५ वर्ष ३ ) महादेव रामजी कंकाळ वय ४५ वर्ष ४ ) जगदेव नारायण सावके वय ५४ वर्ष सर्व रा.तोरनाळा ता.मालेगांव जि.वाशिम याना आज रोजी ताब्यात घेवुन अटक करण्यात आली आहे . महावितरण कर्मचारी याच्यामध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे तर
परिसरात शांतता आहे . तरी पोलीस स्टेशन जउळका हद्दी तील नागरीकांना आवाहन करण्यात येते की , नागरीकांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेवु नये कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या पुर्ण कराव्या . सदर गुन्हयाचा तपास सपोनि मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजेश पंडीत , पोहेकॉ ज्ञानेश्वर राठोड , नापोकॉ निलेश घुगे , पोकॉ दिपक कावरखे , होमगार्ड गणेश सोलव , संतोष गिते हे करीत आहे.


