वन सप्ताहाचे उद्घाटन
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातुर लोकांमध्ये वृक्षलागवडीसाठी जनजागृति व्हावी तसेच वृक्षा रोपणासाठी झाडं सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी राज्य भर जुन ते सप्टेंबर या कालावधीत वन सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.पातुर वनपरिक्षेत्र आज वन सप्ताहाचा शुभारंभ विविध उपक्रमांच्या माध्यमातून करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अकोला वन विभागचे उप वनसंरक्षक के. आर. अर्जुना , सहायक उपवनसरंक्षक, एच. पी. पडगव्हाणकर व निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत मंचकावरउपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिना निमित्त पातुर वनपरिक्षेत्र, निसर्ग कट्टा , महात्मा फुले कला – विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सिडबॉल बनविण्याच्या उपक्रमाचे तसेच पातुर वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांच्यासाठी बिज संकलन या दोन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जवळपास 2000 सिडबॉल ची निर्मीती झाली तर 45 प्रकाच्या विविध स्थानिक बियांचे संकलन करण्यात आले. या बियांचे छोटेखानी प्रदर्शन येते लावण्यात आले होते. उत्कृष्ट बिज संकलनाचे कार्य वनरक्षक सोळंके यांनी केले. या वेळेस त्यांचा व इतर वनरक्षक तसेच सिडबॉल निर्मीती उपक्रमास सहकार्य केलेले सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शिक्षक हर्षल ढोणे महात्मा फुले कला – विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अमृता शिरभाते, शांकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व निसर्गकट्टाचे सदस्य डॉ. मिलींद शिरभाते , आर एल टी विज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. हरिष मालपाणी व पातूर वनपरिक्षेत्र अधिकारी श्री . धिरज मदने यांचा मान्यवऱ्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळेस रोप विक्री स्टॉलचे उद्धाटन मा. के . अर्जुन यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळेस वन कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना उपवन संरक्षक के.अर्जुन म्हणाले की , आपल्या वन परिक्षेत्रातील स्थानिक वृक्षांच्या बिया जमा करून त्या पासून नविन रोपे तयार करणे हे प्रेरणादायी कार्य आहे. हे कार्य करीत असतांना येणाऱ्या पिढीला म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना पण यात समाऊन घेतले हि आनंदाची व सनाधानाची बाब आहे. असेच कार्य करीत वनांच्या संरक्षणासाठी नेहमी प्रत्येकाने कटीबद्ध राहीलेच पाहीजे .
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन धिरज मदने यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.मिलिंद शिरभाते यांनी मांडले.या कार्यक्रमाला पातुर वन परिक्षेत्रातील सर्व वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


