आकापुर येथील घटना
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
नागभीड (१९ जून)- तालुक्यातील तळोधी बा. पासून ७ किलोमीटर अंतरावरील आकापूर येथील आज दिनांक १९ जून ला सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान खटू कुंभरे वय वर्ष ,६७ हा गुराखी वाघाच्या ठार झाला. प्राप्त माहितीनुसार आकापुर येथील खटू कुमरे वय 67 वर्ष हा दररोज गावातील गुरे चारण्यासाठी नेत असे नित्यनियमाप्रमाणे आज सुद्धा त्याने गुरे चारण्यासाठी जंगलात नेले. अगदी शेतालगत दडी मारून बसलेल्या वाघाने अगोदर एका गाईवर हल्ला चढविला.तिला सोडवण्यासाठी गेले असता खटू कूंभरे यांच्यावर वाघाने झडप घातली व जागीच ठार केले .किंचाळण्याचा आवाज ऐकून शेतात काम करीत असणाऱ्या काही महिला आणि पुरुष यांनी धाव घेतली असता गुराखी खंटू कुमरे मृतावस्थेत आढळला. वनविभाग व तळोधी येथील ठाणेदार खैरकर यांनी पंचनामा करून मृत व्यक्तीला शवविच्छेदनसाठी नागभीड येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले
आपल्या