अजिंक्य मेडशिकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी : कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागात लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे.त्याअनुषंगाने आरोग्य विभाग आणि मेडशी ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने लसीकरण मोहीम ग्राम पंचायत सभागृहात राबविण्यात आली. या मोहिमेत 45 वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. सरपंच शेख जमिरभाई यांनी गावात लसीकरणा बाबत जनजागृती केली.ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी प्रोत्साहित केले.यावेळी तहसीलदार रवी काळे,नायब तहसीलदार रवी राठोड, माजी सभापती शेख गनिभाई शेख चाँदभाई, पंचायत समिती सदस्या कौशल्याबाई साठे, सरपंच शेख जमिरभाई, उपसरपंच सोनाली धिरज मंत्री,ग्रामसेवक मोहन वानखडे, वैदयकीय अधिकारी डॉ निलेश जामकर,माजी पंचायत समिती सदस्य गजानन शिंदे पाटील, माजी उपसरपंच शेख रजाकभाई,माजी उपसरपंच गणेशराव घुगे, ग्राम पंचायत सदस्य अमोल तायडे,मूलचंद चव्हाण,संध्याताई भगवानराव घुगे,शांताबाई प्रकाश तायडे, भग्गो रमजान गौरे,मीरा ज्ञानेश्वर मुंढे, पूजा जगदिश राठोड आदींसह तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,शौकत पठाण, प्रियाताई पाठक, मुन्नीबाई बेनिवाले,घिरज मंत्री,ज्ञानेश्वर मुंढे,प्रसाद पाठक, विजय पाल,पत्रकार सोयल पठाण,ग्राम पंचायत कर्मचारी शेख जावेद,बाळु घुगे,मुकेश चव्हाण, सर्वेश खंडेलवाल ,राजकुमार राठोड,दत्ता काळे आदींसह आरोग्य विभागाचे डॉ निलेश जामकर,आरोग्य सेवक फड,भोसले मॅडम,राठोड मॅडम,आशा सेविका मालती चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित होते


